आम्ल, आम्लारी व क्षार

धातूंबरोबर आम्लांची अभिक्रिया

views

03:20
आता आपण धातूंबरोबर आम्लांची अभिक्रिया कशी होते ते पाहू या. धातूंबरोबर आम्लांची अभिक्रिया ही आम्लाची तीव्रता, संहती, तापमान व धातूची क्रियाशीलता यावरून ठरत असते. तीव्र आम्लाच्या विरल द्रावणांच्या अभिक्रिया मध्यम क्रियाशील धातूंबरोबर सामान्य तापमानाला करणे सोपे असते. धातूंची विरल आम्लाबरोबर अभिक्रिया केली की आम्लातील हायड्रोजनला धातू विस्थापित करतो आणि ज्वलनशील हायड्रोजन वायू मुक्त होतो. धातूंचे रूपांतर आम्लारिधर्मी मूलकामध्ये होऊन आम्लातील आम्लधर्मी मूलकाशी त्याचा संयोग होतो व क्षार तयार होत असतो. हायड्रोजन हा ज्वलनशील वायू आहे. त्यामुळे H2 हायड्रोजन वायू जळतो. कारण आम्लातील हायड्रोजनला मॅग्नेशिअम हा क्रियाशील धातू विस्थापित करतो व हायड्रोजन वायू मुक्त होतो. त्याचवेळी धातूंचे रूपांतर आम्लधर्मी मूलकामध्ये होऊन आम्लातील आम्लधर्मी मुलकाशी ते संयोग पावते व क्षार तयार होतो. अशाप्रकारे धातूंबरोबर होणारी तीव्र आम्लांच्या विरल द्रावणाची अभिक्रिया