आम्ल, आम्लारी व क्षार

वैश्विक दर्शक

views

02:32
नैसर्गिक व संश्लिष्ट रंगद्रव्ये आम्लधर्मी व आम्लारिधर्मी द्रावणांमध्ये दोन भिन्न रंग दाखवतात. अशा रंगद्र्व्यांचा आम्ल आम्लारिदर्शक म्हणून उपयोग करतात सामूमधील हा बदल दाखवण्यासाठी वैश्विक दर्शक वापरतात. वेगवेगळ्या सामूला वैश्विक दर्शक वेगवेगळे रंग दाखवतो. अनेक संश्लिष्ट दर्शकांचे विशिष्ट प्रमाणात मिश्रण करून वैश्विक दर्शक बनवले जातात. म्हणूनच ‘अनेक संश्लिष्ट दर्शकांच्या विशिष्ट प्रमाणात एकत्रित मिश्रणाला वैश्विक दर्शक असे म्हणतात’. वैश्विक दर्शकांचे द्रावण किंवा त्यापासून बनवलेल्या कागदी दर्शक पट्टिकेचा उपयोग करून द्रावणाचा सामू ठरवला जातो. सामू मोजण्याची अचूक पध्दत म्हणजे ‘सामूमापक’ (PH meter) हे विद्युतसाधन वापरणे. या पद्धतीत द्रावणात विद्युतअग्र बुडवून सामू मोजला जातो.