आम्ल, आम्लारी व क्षार

क्षार

views

05:14
तीव्र आम्ल व तीव्र आम्लारी यांच्या उदासिनीकरणाने उदासीन क्षार तयार होतो. या क्षारांचे आम्लधर्मी, आम्लारिधर्मी व उदासीन क्षार हे तीन प्रकार आहेत. आम्ल व आम्लारी यांच्यातील अभिक्रियेने क्षार तयार होतात ह्या अभिक्रियेला जरी उदासिनीकरण अभिक्रिया म्हटले तरी निष्पन्न होणारे क्षार हे नेहमीच उदासीन नसतात. हे समजण्यासाठी आपण एक कृती करूया प्रथम सोडियम क्लोराइड, अमोनियम क्लोराइड व सोडियम बायकार्बोनेट या क्षारांच्या राशीपासून त्यांची 10 मिली जलीय द्रावणे तयार करा. आता तयार झालेल्या तीनही जलीय द्रावणांचे सामू मोजा. तिन्ही सामू मोजल्यानंतर कळते की, सोडियम क्लोराइडचे जलीय द्रावण सामू (PH)7 उदासीन, अमोनियम क्लोराइडच्या सामू (PH)7 पेक्षा कमी म्हणून तो आम्लधर्मी तर सोडियम बायकार्बोनेटच्या सामू (PH)7 पेक्षा जास्त असल्याने आम्लारिधर्मी आहेत. आम्लधर्मी क्षार आहे: अमोनिअम नायट्रेट. आम्लारिधर्मी क्षार आहेत: सोडियम कार्बोनेट व सोडियम अॅसिटेट. आणि उदासीन क्षार आहेत: सोडियम सल्फेट, पोटॅशिअम क्लोराइड, आणि सोडियम क्लोराइड.