आम्ल, आम्लारी व क्षार

आयनिक संयुगे व विद्युतवाहकता

views

05:22
जेव्हा विजेच्या दिव्यांमधून विद्युत प्रवाह जातो तेव्हाच दिवा लागतो आणि जेव्हा विद्युत परिपथ पूर्ण होतो तेव्हाच हे घडू शकते. सोडिअम क्लोराइड NaCl, कॉपर सल्फेट CuSO4, सल्फ्युरिक अॅसिड H2SO4 व सोडिअम हायड्रॉक्साइड NaOH ही जलीय द्रावणे वापरली तर विद्युत परिपथ पूर्ण होतो असे दिसून येते. याचा अर्थ असा की ही विद्युत द्रावणे विद्युत वाहक आहेत. विजेच्या तारेमधून वीज वाहून नेण्याचे कार्य इलेक्ट्रॉन करतात. द्रावण किंवा द्रव यांमधून वीज वाहून नेण्याचे काम आयन करत असतात. परिपथामध्ये जेव्हा द्रव किंवा द्रावण असते तेव्हा त्यात दोन तारा/कांड्या किंवा पट्ट्या बुडवल्या जातात. त्यांना विद्युत अग्र (Electrode) असे म्हणतात. तर विद्युतअग्र सामान्यतः विद्युतवाहक स्थायूचे बनवतात. बॅटरीच्या ऋण टोकाला वाहक तारेने जोडलेले विद्युतअग्र म्हणजे ऋणाग्र (Cathod) तर बॅटरीच्या धनटोकाला जोडलेले विद्युतअग्र म्हणजे धनाग्र (Anode) होय.