आम्ल, आम्लारी व क्षार

पाण्याचे विद्युत अपघटन

views

03:14
पाण्याचे हे विद्युत अपघटन कसे होते ते आपण एका प्रयोगाद्वारे समजून घेऊ 500 मिली शुद्ध पाण्यात 2 ग्रॅम मीठ विरघळू द्या. मीठ विरघळलेल्या या द्रावणातील 250 मिली द्रावण हे 500 मिली धारकतेच्या चंचुपात्रात घ्या. पॉवर सप्लायच्या धन व ऋण टोकांना विजेच्या दोन तारा जोडा. तारांच्या दुसऱ्या टोकांकडील 2 सेमी भागावरील रोधक आवरण काढून टाका. आता ही दोन विद्युत अग्रे झाली. आता आकृतीत दाखवल्याप्रमाणे दोन परीक्षानळ्या तयार केलेल्या मिठाच्या विरल द्रावणाने काठोकाठ भरा. ह्या परीक्षानळ्या हवा आत शिरू न देता विद्युतअग्रावर पालथ्या घाला. आणि पॉवर सप्लायमधून 6 व्होल्ट दाबाखाली वीजप्रवाह सुरू करा. ऋणाग्रापाशी तयार होणाऱ्या हायड्रोजन H2, वायूचे आकारमान धनाग्रापाशी तयार होणाऱ्या ऑक्सिजन वायूच्या दुप्पट आहे. यावरून ऋणाग्रापाशी हायड्रोजन वायू तर धनाग्रापाशी ऑक्सिजन वायू तयार होतो हे कळते. त्यावेळेस पुढीलप्रमाणे अभिक्रिया घडत असताना आपल्याला दिसून येतात. यावरून स्पष्ट होते की पाण्याचे विद्युत अपघटन होऊन त्यातील घटक मूलद्रव्ये मुक्त होतात.