आम्ल, आम्लारी व क्षार

स्फटिकजल

views

04:46
मोरचूद तापवल्याने पाणी बाहेर पडणे, स्फटिक संरचना मोडणे, निळा रंग जाणे हे सर्व भौतिक बदल आहेत. या प्रयोगावरून आपण असे म्हणू शकतो की, आयनिक संयुगे स्फटिकस्वरूप असतात. त्यांची स्फटिकी संरचना आयनांच्या विशिष्ट मांडणीतून तयार होते. काही संयुगाच्या स्फटिकामध्ये पाण्याच्या रेणूंची संख्या निश्चित असते. व या रेणूंचासुद्धा समावेश या मांडणीमध्ये झालेला असतो. गरम केल्यामुळे किंवा काही काळ नुसते ठेवण्याने स्फटिकजल बाहेर पडते, आणि त्या भागाचे स्फटिकरूप नष्ट होते. उदा. मोरचुदाचे स्फटिकजल (कॉपर सल्फेट)CuSO4 ,5H2O हे रासायनिक संयुगाच्या रासायनिक सूत्राच्या विशिष्ट प्रमाणात असते. 1. स्फटिकरूप मोरचूद - CuSO4 . 5H2O 2. स्फटिकरूप फेरस सल्फेट – (ग्रीन व्हिट्रिऑल) FeSO4.7H2O 3. स्फटिकरूप सोडा – Na2CO3.1OH2O 4. तुरटी K2SO4.AL2(SO4)3.24H2O