आम्ल, आम्लारी व क्षार

आम्ल व आम्लारीची संहती

views

04:17
आता आपण आम्ल व आम्लारीची संहती समजून घेऊ. द्राव्याच्या राशीचे द्रावणाच्या राशीशी असलेल्या प्रमाणाला द्राव्याची द्रावणातील संहती म्हणतात. जरी दोन्ही द्रावणांमध्ये द्राव्याची राशी समान असली तरी द्रावकाची राशी कमी – अधिक आहे. द्राव्याच्या राशीचे तयार झालेल्या द्रावणाच्या राशींशी प्रमाण वेगवेगळे आहे. खाद्यपदार्थाची चव ही त्यातील चव देणारा घटक पदार्थ कोणता व त्याचे प्रमाण किती आहे, यावर अवलंबून असते. तसेच द्रावणाचे सर्व गुणधर्म हे त्यातील द्रावक व द्राव्य यांच्या स्वरूपावर तसेच द्रावणामध्ये द्राव्याचे प्रमाण किती आहे यावर अवलंबून असते. “द्राव्याच्या राशीचे द्रावणाच्या राशीशी प्रमाण म्हणजे द्राव्याची द्रावणातील संहती होय.” जेव्हा द्रावणात द्राव्याची संहती जास्त असते तेव्हा ते संहत द्रावण असते व जेव्हा द्राव्याची संहती कमी असते तेव्हा ते विरल द्रावण असते. द्रावणाची संहती व्यक्त करण्यासाठी अनेक एककांचा उपयोग करतात.