आम्ल, आम्लारी व क्षार

द्रावणाचा सामू

views

04:48
आता आपण द्रावणाचा सामू कशाला म्हणतात ते पाहू. आपण पाहिले की पाण्यात विरघळल्यावर आम्ल व आम्लारीचे कमी – जास्त प्रमाणात विचरण होते. आणि हायड्रोजन आयन H+ व हायड्रॉक्साइड आयन OH- हे आयन तयार होतात. सर्व नैसर्गिक जलीय द्रावणांमध्ये हायड्रोजन आयन H+ व हायड्रॉक्साइड आयन OH- हे आयन विविध प्रमाणात आढळून येतात. PH म्हणजे power of haydrogen म्हणजेच द्रावणाचा सामू. हे मूल्य द्रावणाचा आम्लधर्म किंवा आम्लारिधर्म दर्शवते. याच्या सहाय्याने हायड्रोजन आयनांची संहती मोजता येते. हायड्रोजन आयन H+ व OH- हायड्रॉक्साइड आयन यांच्या प्रमाणानुसार मृदेचे आम्लधर्मी, उदासीन व आम्लारिधर्मी असे प्रकार पडतात. रक्त, पेशीद्रव्य यांचे कार्य व्यवस्थित पार पडण्यासाठी त्यांच्यातील हायड्रोजन आयन H+ व OH- हायड्रॉक्साइड आयन यांचे प्रमाण ठरावीक असणे आवश्यक असते. सूक्ष्मजीवांच्या मदतीने केल्या जाणाऱ्या किण्वन किंवा इतर जैवरासायनिक प्रक्रिया तसेच विविध रासायनिक प्रक्रियांमध्ये हायड्रोजन आयन H+ व OH- हायड्रॉक्साइड आयन यांचे प्रमाण विशिष्ट मर्यादांमध्ये राखणे आवश्यक असते. शुद्ध पाण्याचे सुद्धा थोडया प्रमाणात विचरण होते, आणि हायड्रोजन आयन H+ व OH- हायड्रॉक्साइड आयन हे आयन समप्रमाणात तयार होतात. रासायनिक व जैवरासायनिक प्रक्रियांमध्ये अतिशय उपयोगी असे H+ हायड्रोजन आयनांच्या संहतीचे एक सोयीस्कर असे माप डॅनिश वैज्ञानिक सोरेनसन याने इ. स. 1909 मध्ये सुरू केले. हे माप म्हणजेच ‘सामू मापन श्रेणी होय.