वर्गसमीकरणे

वर्गसमीकरणाची मुळे (उकली)

views

5:19
x ची a ही किंमत घेवून बहुपदीची किंमत 0 येत असेल तर (x - a) हा त्या बहुपदीचा अवयव असतो. म्हणजे p(x) ही बहुपदी असेल आणि p(a)=o असेल तर (x - a) हा p(x) चा अवयव असतो. या स्थितीत a ही p(x) = 0 ची उकल आहे. किंवा a हे p(x) = 0 चे एक मुळ आहे असे म्हणतात. उदा.1) x 2+ 5x - 6 या बहुपदीत x ची किंमत – 6 घेवू. x 2+ 5x - 6 = (-6)2+ 5 × (-6) - 6 = 36 - 30 -6 = 0 = 36 - 36 = 0 म्हणजेच x = -6 ही x 2+5 x -6 या समीकरणाची उकल आहे. म्हणजेच -6 हे x 2+5 x -6=0 या समीकरणाचे मूळ आहे. उदा.2). x2+5 x -6 = 0 या बहुपदीत x = 2 घेऊ. (2)2 + 5 × (2)-6 =0 (ज्या ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी 2 ही किंमत लिहिली. 4 + 10 – 6 = 0 14 -6 = 0 8 = 0 14 मधून 6 वजा केले की 8 उरतात. म्हणजे यांची वजाबाकी 0 येत नाही म्हणून ∴ x = 2 ही x 2+5 x -6 या समीकरणाची उकल नाही किंवा मूळ नाही.