वर्गसमीकरणे

पूर्ण वर्गपद्धतीने वर्ग समीकरण सोडवणे

views

3:29
आपण पूर्ण वर्गपद्धतीने वर्ग समीकरणे कशी सोडवायची ते पाहूया. मला सांगा x2+10 x + 2 = 0 हे वर्गसमीकरण आहे की नाही? हो हे वर्गसमीकरण आहे. कारण ते ax2+bx+c = 0 या रुपात आहे. येथे x या चलाचा जास्तीत जास्त घातांक 2 आहे, आणि a ची किंमत शून्य नाही. मग हे वर्ग समीकरण तुम्हाला सोडवता येईल का? नाही, कारण 2 या संख्येचे असे अवयव नाही सांगता येत की ज्याची बेरीज 10 येईल. अशी उदाहरणे सोडविण्यासाठी वेगळी रीत वापरावी लागेल. x2+10x या राशीत योग्य पद मिळवून एक पूर्ण वर्गराशी मिळवू. जर x2+10x + k = (x+a)2 आहे तर x2+ 10x + k = x2 + 2ax + a2 असेल.. आता सहगुणकाची तुलना केल्यावर 10 = 2a आणि k = a2 आहे. 2 हा अंक गूणाकार रुपात आहे म्हणून बरोबर चिन्हाच्या विरुद्ध दिशेला गेल्यावर त्याचा भागाकार होईल. ∴10/2 = 5. म्हणून a = 5. आणि k = a2 दिलेला आहे. म्हणून a ची किंमत 5 ठेवून त्याचा वर्ग करू (5)2 = 25.