लोकसंख्या Go Back लोकसंख्येची घनता views 4:23 मुलांनो प्रथम 2 x 2 मी. आकाराचा चौरस आखून घ्या. या चौरसात सुरूवातीला दोन मुलांना उभे करा. त्यानंतर थोड्या वेळाने चार मुले, नंतर सहा मुले, पुन्हा आठ मुले अशी दोन –दोनने संख्या वाढवीत जा. तुम्ही दोघे चौरसात होता त्यावेळी चौरसात सहज हालचाल करता येत होती का? हो, होती. नंतर चार जण, मग सहा जण झालो. त्यावेळीही आमच्या क्षेत्रात सहजपणे हालचाल करता येत होती. परंतु नंतर जसजशी मुलांची संख्या वाढत गेली. तसतशी हालचाल करायला अडचण निर्माण होऊ लागली. आता तुमचा चौरस पूर्णपणे भरला आहे अशा वेळी आणखी मुले चौरसात उभी केली तर चालतील काय? आता आणखी मुले चौरसात उभी केली तर आम्हांला व्यवस्थित उभे राहणे जमणार नाही. तुम्हांला हा प्रयोग करताना व तो पाहाताना काय वाटते ते सांगायचे आहे. प्रस्तावना लोकसंख्या वाढ लोकसंख्येचे वितरण लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक लोकसंख्येची घनता लोकसंख्येची रचना करून लिंग गुणोत्तर वयोगट प्रमाण करून पहा स्थलांतर भौगोलिक स्पष्टीकरण - स्थलांतरण भौगोलिक स्पष्टीकरण: लोकसंख्या – एक संसाधन करून पहा: महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता माहीत आहे का तुम्हांला?