वर्तुळ

अंतर्लिखित कोन

views

06:33
अंतर्लिखित कोन: मुलांनो, आता आपण अंतर्लिखित कोन म्हणजे काय ते समजून घेऊ.मुलांनो,हे C केंद्र असलेले वर्तुळ आहे. या वर्तुळात कोन PDQ आहे. या कोन PDQ चा शिरोबिंदू D वर्तुळावर आहे. या कोनाच्या भुजा DP आणि DQ वर्तुळाला अनुक्रमे A आणि B मध्ये छेदतात. अशा कोनाला वर्तुळात किंवा कंसात अंतर्लिखित केलेला कोन म्हणतात. उदा. येथे कोन ∠ ADB हा कंस ADB मध्ये अंतर्लिखित आहे असे म्हणता येईल. अंतर्खंडितकंस:- मुलांनो या आकृतीत कोन ∠ ABC च्या अंतर्भागात येणाऱ्या वर्तुळकंसाला ∠ ABC ने अंतरर्खंडितकेलेला कंस म्हणतात.