आम्ल, आम्लारी व क्षार

प्रस्तावना

views

04:05
चवीचे चार प्रकार आहेत. आंबट, गोड, कडू, खारट. आपण खाण्यामध्ये अशा विविध प्रकारच्या चवींचा नेहमी आनंद घेत असतो. खाद्यपदार्थातील काही पदार्थ हे चवीला आंबट असतात, तर काही पदार्थ तुरट असतात. त्याचप्रमाणे काही पदार्थांना स्पर्श केल्यानंतर त्यामध्ये वेगळेपणा दिसून येतो. काही पदार्थ कठीण असतात, तर काही पदार्थ बुळबुळीत आहेत असे जाणवते. या पदार्थांचा वैज्ञानिकांनी जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्यांना पदार्थामध्ये आम्लधर्मी व आम्लारिधर्मी घटक असतात लिंबू, चिंच, खाण्याचा सोडा, ताक, व्हिनेगर, संत्रे, दूध, टोमॅटो, मिल्क ऑफ मॅग्नेशिआ, पाणी, तुरटी या पदार्थाचे लिटमससारख्या दर्शकाच्या साहयाने आम्ल, आम्लारी, क्षार, अशा तीन गटांत वर्गीकरण करता येते. पदार्थामध्ये लाल लिटमसपेपर टाकला असता तो जेव्हा निळा होतो तेव्हा तो पदार्थ आम्लारिधर्मी असतो . आणि जेव्हा निळा लिटमस पेपर पदार्थात टाकला असता तो लाल होतो तेव्हा तो पदार्थ आम्लधर्मी असतो. आणि जेव्हा लिटमस पेपरवर कोणताच बदल होत नाही तेव्हा तो पदार्थ उदासीन असतो. आम्ल, आम्लारी व क्षार हे तीन आयनिक संयुगांचे प्रकार आहेत. नैसर्गिक पदार्थांमध्ये व्हिनेगर, चिंच, लिंबू, दही, आवळा ही आम्ले आढळून येतात. तर आम्लारी पदार्थ हे चवीला तुरट असतात. याच आम्ल व आम्लारींची रासायनिक अभिक्रिया होऊन क्षार व पाणी तयार होते. त्यासाठी विविध तंत्राचा वापर करावा लागतो. तर या पाठामध्ये आपण आम्ल, आम्लारी व क्षारांची माहिती करून घेणार आहोत.