मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण Go Back प्रस्तावना views 3:56 आपण नेहमी विज्ञानात कॅल्शियम, क्लोरीन, कार्बन, लिथीअम अशी नावे ऐकतो. ही मुलद्रव्ये आहेत. मुलद्रव्य म्हणजे ज्या पदार्थांचा रेणू एकाच प्रकारच्या अणूंचा बनलेला असतो असा मुलभूत रासायनिक पदार्थ होय. द्रव्याचे प्रकार कोणते? स्थायू, द्रव, वायू हे द्रव्याचे प्रकार आहेत. त्याचप्रमाणे प्लाझ्मा हा देखील द्रव्याचा एक प्रकार आहे. प्लाझ्मा ही उच्च तापमानात आढळते. धातू, अधातू व धातूसदृश्य हे मूलद्रव्यांचे प्रकार आहेत. द्रव्याच्या लहानात लहान कणाला अणू म्हणतात. मूलद्रव्यात प्रत्येक कण एकसारख्याच पदार्थाने बनलेला असतो. तर संयुगे ही दोन किंवा अधिक मुलद्र्व्यांनी बनलेली असतात. उदा. लोखंड, तांबे ही एकसारख्याच पदार्थाच्या कणांनी बनलेली आहेत. परंतु मीठ, पाणी, साखर इत्यादी संयुगे ही वेगवेगळया पदार्थांच्या कणांनी म्हणजेच मूलद्रव्यांनी बनलेली आहेत. तसेच आपण मूलद्रव्यांचे भौतिक किंवा रासायनिक पद्धतीने विभाजन करू शकत नाही. परंतु आपण संयुगांच्या रेणूचे रासायनिक प्रक्रियेने अपघटन करू शकतो. प्रस्तावना डोबरायनरची त्रिके सांगा पाहू न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम मेंडेलीव्हची आवर्तसारणी परिचय शास्त्रज्ञांचा [फोटो –दिमित्री मेंडेलीव्ह] मेंडेलीव्ह्च्या आवर्तसारणीतील त्रुटी आधुनिक आवर्तसारणी आधुनिक आवर्तसारणीची रचना गण व इलेक्ट्रॉन संरुपण: सांगा पाहू आवर्त व इलेक्ट्रॉन संरुपण आधुनिक आवर्तसारणीतील आवर्ती कल अणु आकारमान धातू-अधातू गुणधर्म जरा डोके चालवा