मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण

डोबरायनरची त्रिके

views

3:47
डोबरायनर हे एक जर्मन वैज्ञानिक शास्त्रज्ञ होते. त्यांनी सन 1817 मध्ये मूलद्रव्यांचे गुणधर्म व त्यांची अणुवस्तुमाने यात संबंध असल्याचे सांगितले. डोबरायनर यांनी एकसारखे रासायनिक गुणधर्म असलेल्या प्रत्येकी तीन मुलद्रव्यांचे गट पाडले आणि त्यांना त्रिके असे नाव दिले. या प्रत्येकी एका गटात म्हणजेच ‘त्रिकात’ तीन मुलद्रव्ये होती. त्यांनी एक त्रिकामधील तीन मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने केली. आणि दाखवले की, मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तूमानांच्या सरासरी इतके असते. परंतु माहित असलेल्या सर्व मूलद्रव्यांचे वर्गीकरण डोबरायनरच्या त्रिकात होऊ शकले नाही. पहिल्या त्रिकात डोबरायनर यांनी लिथिअम (Li), सोडीअम(Na) आणि पोटॅशिअम(k) ही तीन मूलद्रव्ये घेतली आहेत. ती अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडली.