मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण Go Back आधुनिक आवर्तसारणी views 5:08 मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणूअंकाच्या चढत्या क्रमाने केल्यावर मूलद्रव्यांचे जे वर्गीकरण मिळते त्याला आधुनिक आवर्तसारणी असे म्हणतात. आधुनिक आवर्तसारणीत हेनरी मोजले यांनी अणूअंक आधारभूत मानले. आणि मूलद्रव्याच्या गुणधर्माचे भाकीत अणुअंकाच्या आधारे करून आधुनिक आवर्तसारणी तयार केली. या आधुनिक आवर्तसारणीलाच दीर्घरूप असेही म्हणतात. मेंडेलीव्ह्च्या आवर्तसारणीत मुलद्रव्यांचे पुर्णांकी वस्तुमान समान असल्याने त्यांच्या क्रमाबद्दल शंका निर्माण झाली होती. तसेच मूलद्रव्यांच्या अणुवस्तूमानाच्या दरात नियमित वाढ होत नसे. म्हणून शोध लागलेल्या नवीन मूलद्रव्यांचे भाकीत करता येत नव्हते. तसेच समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म हे समान तर अणूवस्तुमाने भिन्न असल्यामुळे त्यांना आवर्तसारणीत जागा कशी दयायची हा प्रश्न निर्माण झाला होता. अणूंमध्ये इलेक्ट्रॉन असतात. अणूंमधील इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती कवचामध्ये असतात. अणूंमधील इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवतीच्या कवचांमध्ये ज्याप्रकारे वितरीत झालेले असतात ते इलेक्ट्रॉन संरुपन त्यांच्या एकूण संख्येवरून ठरते. तसेच अणूंमधील इलेक्ट्रॉनची संख्या ही अणूअंकाइतकीच असते. प्रस्तावना डोबरायनरची त्रिके सांगा पाहू न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम मेंडेलीव्हची आवर्तसारणी परिचय शास्त्रज्ञांचा [फोटो –दिमित्री मेंडेलीव्ह] मेंडेलीव्ह्च्या आवर्तसारणीतील त्रुटी आधुनिक आवर्तसारणी आधुनिक आवर्तसारणीची रचना गण व इलेक्ट्रॉन संरुपण: सांगा पाहू आवर्त व इलेक्ट्रॉन संरुपण आधुनिक आवर्तसारणीतील आवर्ती कल अणु आकारमान धातू-अधातू गुणधर्म जरा डोके चालवा