मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण

आधुनिक आवर्तसारणीची रचना

views

4:04
मेंडेलीव्हच्या आवर्तसारणी प्रमाणेच आधुनिक आवर्तसारणीत देखील आडव्या ओळी व उभे स्तंभ आहेत. आधुनिक आवर्तसारणीत सात आडव्या ओळी आहेत, त्यांना आवर्त असे म्हणतात. म्हणजेच 1 ते 7 आवर्त आहेत. तसेच या सारणीत उभे अठरा स्तंभ आहेत, त्यांना गण असे म्हणतात. म्हणजेच 1 ते 18 गण आहेत. आवर्त व गण यांच्या रचनेतून एक चौकट तयार होते. या चौकटीमध्ये वरच्या बाजूला ओळीने अणूअंक दर्शविले आहेत. प्रत्येक चौकटीत एका मुलद्रव्याची जागा आहे. या सारणीत आपल्याला या सात ओळींव्यतिरिक्त आणखी तळाशी या दोन स्वतंत्र ओळी दिसत आहेत. यात पहिल्या ओळीला लॅन्थॅनाइड श्रेणी तर दुसऱ्या ओळीला अॅक्टीनाइड श्रेणी म्हणतात. या दोन श्रेणींसहीत आवर्तसारणीत एकूण 118 चौकटी आहेत. म्हणजेच आधुनिक आवर्तसारणीत 118 मूलद्रव्यांकरिता जागा आहे. यावरून आपल्या असे लक्षात येते की, अगदी अलीकडे शोध लागलेल्या मूलद्रव्यांना देखील आधुनिक आवर्त सारणीत जागा आहे. आधुनिक आवर्तसारणी ही चार खंडामध्ये विभागली गेली आहे. पहिला खंड - एस(S) हा गण 1 व 2 यांचा बनलेला आहे. दुसरा खंड डी (d) हा गण 3 ते गण - 12 चा बनलेला आहे. तिसरा खंड पी (P). यामध्ये गण 13 ते गण 18 यांचा समावेश होतो. तर चौथा खंड एफ (F). यामध्ये लॅन्थॅनाइड व अॅक्टीनाइड या दोन तळाशी असलेल्या श्रेणी येतात. डी खंडातील मूलद्रव्यांना संक्रमण मुलद्रव्ये म्हणतात. आवर्तसारणीत P खंडात एक नागमोडी रेषा दाखविली आहे. या नागमोडी रेषेमुळे आवर्तसारणीतील मूलद्रव्ये तीन प्रकारे दाखविता आली. या नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला Al (अॅल्युमिनिअम) Ga (गॅलिलीअम), In (इनडीअम), टायरेनियम (Ti), टीन(Sn), सीसा(Pb), निहोनियम(Nh), फ्लोरोवियम(Fl) ही धातू आहेत. तर उजव्या बाजूला सिलिकॉन(Si), अर्सेनिक(As), बोरॉन(B), कार्बन(C), एस्टाटीन(At), टेलेरीयम(Te), सेलेनियम(Se), सल्फर(S) ही अधातू आहेत. तसेच नागमोडी रेषेच्या किनारी भागात धातू सदृश्य मूलद्रव्ये आहेत.