मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण

आवर्त व इलेक्ट्रॉन संरुपण

views

4:26
आधुनिक आवर्तसारणीचा अभ्यास केल्यावर असे दिसते की, लिथिअम (Li), बेरीलीअम (Be), बोरॉन(B), कार्बन(C), नायट्रोजन(N), ऑक्सीजन(O), फ्लोरिन(F), व निऑन(Ne) ही मूलद्रव्ये आवर्त-2 मध्ये आहेत. यावरून आपल्या असे लक्षात येते की, आवर्त-2 मधील मूलद्रव्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या वेगवेगळी आहे. मात्र त्यांच्यातील कवचांची संख्या एकसारखी आहे. हेही लक्षात येते की, आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना म्हणजेच आवर्त-2 मध्ये लिथीअम कडून निऑनकडे जाताना अणूअंक एकाने वाढतो. तशी संयुजा इलेक्ट्रॉनची संख्यादेखील वाढते. दुसऱ्या आवर्तातील लिथीअम (Li), बेरीलीअम (Be), बोरॉन (B), कार्बन (C), नायट्रोजन (N), ऑक्सीजन (O), फ्लोरिन (F), निऑन (Ne), या मुलद्रव्यांची इलेक्ट्रॉन कवचांची संख्या एकसारखीच म्हणजे दोन आहे. त्या दोन कवचांना K व L असे म्हणतात. म्हणजेच दुसऱ्या आवर्तातील मूलद्रव्यांना K व L असे दोन कवच आहेत. तसेच तिसऱ्या आवर्तात असलेल्या सोडीअम (Na), मॅग्नेशिअम (Mg), अॅल्युमिनिअम (Al), सिलिकॉन (Si), फॉस्फरस (P), सल्फर (S), क्लोरीन (Cl), ऑरगॅान (Ar) या सर्व मूलद्रव्यांना इलेक्ट्रॉनचे K, L व M असे तीन कवच आहेत. या आकृती वरून आपल्याला लक्षात येते की, आवर्त 2 व 3 मधील मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉनात डावीकडून उजवीकडे जाताना एक एक इलेक्ट्रॉन वाढत जात आहे. तसेच आवर्त 2 संपल्यानंतर आवर्त 3 सुरु होताना मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉनचा कवच एकाने वाढला आहे. आणि आवर्त - 3 मधील सर्व मूलद्रव्यांना 3 कवच आहेत. परंतु आवर्त - 4 सुरु झाल्यावर आवर्त - 4 मधील सर्व मूलद्रव्यांना 4 कवच आहेत. आकृतीमध्ये आवर्त - 3 मधील शेवटचा मुलद्रव्य ऑरगॅानचे इलेक्ट्रॉन संरुपण दाखविले आहे.