मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण Go Back मेंडेलीव्हची आवर्तसारणी views 3:36 आवर्तसारणीलाच इंग्लिशमध्ये Periodic table असे म्हणतात. आवर्त सारणी ही रासायनिक मूलद्रव्यांना तक्त्याच्या रूपात दर्शविण्याची एक पद्धत आहे. आपण मूलद्रव्यांना कोष्टकरुपात दाखविण्याच्या पद्धती पहिल्या. उदाहरणार्थ डोबेरायनरची त्रिके आणि न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम. या पद्धतींनी सर्व मुलद्रव्ये मांडणीत बसू शकत नव्हते. नंतर इ.स. १८६९ ते १८७२ च्या काळात एका रशियन शास्त्रज्ञाने दिमीत्री मेंडेलीव्ह याने प्रथम ही आवर्त सारणी आधुनिक पद्धतीने मांडली. मेंडेलीव्हने अणुवस्तुमान हा मूलद्रव्यांचा मुलभूत गुणधर्म आहे असे मानले. त्यानंतर त्याने माहित असलेली ६३ मूलद्रव्ये त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडली. मेंडेलीव्हने या आवर्तसारणीत मुलद्रव्यांची त्यांच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मानुसार रचना केली. मूलद्रव्याचे भौतिक व रासायनिक गुणधर्म हे त्याच्या अणूवस्तूमानाचे आवृत्ती फल आहेत. आवृत्ती म्हणजेच विशिष्ट काळानंतर होणारी पुनरावृत्ती होय. मूलद्रव्यांच्या आवर्तसारणीची रचना करताना, मेंडेलीव्हने सर्वप्रथम हायड्रोजन व ऑक्सिजन ही मूलद्रव्ये विचारात घेतली. त्यांनी मूलद्रव्यांच्या हायड्रोजन व ऑक्सिजन बरोबर झालेल्या हायड्राइड व ऑक्साईड संयुगांची रेणुसुत्रे हे रासायनिक गुणधर्म आणि मूलद्रव्यांचे तसेच त्यांच्या हायड्राइड व ऑक्साईड या संयुगांचे द्रवणांक, उत्कलनांक व घनता हे भौतिक गुणधर्म विचारात घेतले. या गुणधर्मांचा विचार केल्यावर मेंडेलीव्हच्या असे लक्षात आले की, ठराविक कालावधीनंतर भौतिक व रासायनिक गुणधर्मांमध्ये सारखेपणा असलेल्या मुलद्रव्यांची पुनरावृत्ती होते. म्हणजेच ती मूलद्रव्य पुन्हा निर्माण करता येतात. या निरीक्षणाच्या आधरे त्यांनी आवर्त सारणी तयार केली. मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्तीफल असतात. मेंडेलीव्हने या आवर्तसारणीत मूलद्रव्यांना त्यांच्या अणुवस्तूमानाच्या चढत्या क्रमाने मांडले. त्यानंतर मेंडेलीव्हने मुलद्रव्यांची आडव्या ओळीत मांडणी करण्यास सुरुवात केली. त्या आडव्या ओळीना ‘आवर्त’ असे म्हणतात. प्रस्तावना डोबरायनरची त्रिके सांगा पाहू न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम मेंडेलीव्हची आवर्तसारणी परिचय शास्त्रज्ञांचा [फोटो –दिमित्री मेंडेलीव्ह] मेंडेलीव्ह्च्या आवर्तसारणीतील त्रुटी आधुनिक आवर्तसारणी आधुनिक आवर्तसारणीची रचना गण व इलेक्ट्रॉन संरुपण: सांगा पाहू आवर्त व इलेक्ट्रॉन संरुपण आधुनिक आवर्तसारणीतील आवर्ती कल अणु आकारमान धातू-अधातू गुणधर्म जरा डोके चालवा