मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण

मेंडेलीव्ह्च्या आवर्तसारणीतील त्रुटी

views

3:48
1)मुलांनो, आवर्तसारणीचे निरीक्षण केले असता आपल्या लक्षात येते की, कोबाल्टचे (Co) व निकेलचे (Ni) पूर्णांकी अणुवस्तुमान हे 59 आहे. म्हणजेच दोन्ही मूलद्रव्याचे अनुवस्तुमान समान आहे. त्या दोन्ही मूलद्रव्यांचे अनुवस्तुमान समान असल्याने त्यांच्या क्रमाबद्दल मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीत संदिग्धता (शंका)होतीच. 2) दुसरी त्रुटी म्हणजे समस्थानिके. मेंडेलीव्हच्या आवर्तसारणी नंतर खूप काळाने समस्थानिकांचा शोध लागला. समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान तर अणुवस्तुमाने भिन्न असल्यामुळे त्यांना मेंडेलीव्ह्च्या आवर्तसारणीत जागा कशाप्रकारे दयायची हे एक मोठे आव्हान उभे राहिले. 3) मूलद्रव्यांच्या अणूवस्तुमानातील वाढ ही नियमित होत नसे. त्यामुळे दोन जड मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल याचे भाकीत करणे मेंडेलीव्ह्च्या आवर्तसारणीच्या नियमानुसार शक्य नव्हते. 4) आवर्तसारणीचे निरीक्षण केले असता, हायड्रोजनच्या स्थानासंदर्भात प्रश्न निर्माण होतात. आवर्तसारणीतील गण VII पाहिला असता लक्षात येते की, हायड्रोजन हा हॅलोजनांशी साम्य दर्शवितो. जसे की हायड्रोजनचे रेणूसूत्र H2 आहे. तर फ्लुओरिन (F) व क्लोरीन (CL) यांची रेणूसूत्रे F2 व CL2 अशी आहेत. तसेच आवर्तसारणीतील या सारणीत 3 हायड्रोजन व अल्कधातू आवर्तसारणीतील गण I यांच्या रासायनिक गुणधर्मामध्येही सारखेपणा आहे. अल्कधातू म्हणजे सोडियम (Na) पोटशिअम (k) इत्यादी. हायड्रोजन व सोडीअम (Na) यांनी क्लोरीन व ऑक्सिजन यांच्या बरोबर तयार केलेल्या संयुगांच्या रेणूसुत्रांमध्ये तयार झालेला सारखेपणा या सारणीत आहे.