मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण Go Back न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम views 3:28 जॉन न्यूलँड्स हा एक इंग्लिश वैज्ञानिक होता. त्याने एका वेगळया मार्गाने अणुवस्तुमानांचा सहसंबंध मुलद्रव्यांच्या गुणधर्मांशी जोडला. सन 1866 मध्ये, त्याने माहित असलेली सर्व मूलद्रव्ये अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडली. या मांडणीची सुरूवात सर्वात हलक्या हायड्रोजन या मुलद्रव्याने केली. आणि शेवट थोरिअमने केला. न्यूलँड्स यांनी या मांडणीचे निरक्षण केले असता त्यांना असे दिसले की, प्रत्येक आठव्या मूलद्रव्याचे व पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म सारखे होते. उदाहरणार्थ, जसे मांडणीत सोडीअम (Na) हे लिथीअमपासून (Li) आठवे मूलद्रव्य आहे आणि त्यांचे गुणधर्मदेखील सारखे आहेत. तसेच मग्नेशिअम (Mg) हे देखील बेरिलिअम (Be) पासून आठवे मुलद्रव्य आहे आणि त्या दोघांचे गुणधर्मदेखील एकसारखेच आहेत. तसेच न्यूलँड्सच्या अष्टाकांच्या मांडणीत क्लोरीन (CL) हे फ्ल्युओरीन (f) पासून आठवे मुलद्रव्ये असून त्यांच्या गुणधर्मांमध्येही एकसारखेपणा आहे. म्हणून जॉन न्यूलँड्सने आठव्या व पहिल्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मांमध्ये दिसून येणाऱ्या सारखेपणाला अष्टकांचा नियम असे म्हटले. न्यूलँड्सच्या या अष्टकांच्या मांडणीचा अभ्यास केल्यावर त्यात खूप त्रुटी आढळून आल्या. मांडणीत हा नियम फक्त कॅल्शिअमपर्यंतच लागू होत होता. न्यूलँड्सने माहित असलेली सर्व मूलद्रव्ये 7 x 8 अशा 56 रकान्यांच्या तक्त्यात बसविली. सर्व मूलद्रव्ये तक्त्यात समाविष्ट करून घेण्यासाठी त्याने एका जागेवर दोन-दोन मूलद्रव्ये बसविली. उदाहरणार्थ, आकृतीत दाखविल्याप्रमाणे कोबाल्ट (Co) व निकेल (Ni), सिझिअम (Ce) व लँथेनम (La) ही मूलद्रव्ये एकाच रकाण्यात जोडीने बसविली आहेत. प्रस्तावना डोबरायनरची त्रिके सांगा पाहू न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम मेंडेलीव्हची आवर्तसारणी परिचय शास्त्रज्ञांचा [फोटो –दिमित्री मेंडेलीव्ह] मेंडेलीव्ह्च्या आवर्तसारणीतील त्रुटी आधुनिक आवर्तसारणी आधुनिक आवर्तसारणीची रचना गण व इलेक्ट्रॉन संरुपण: सांगा पाहू आवर्त व इलेक्ट्रॉन संरुपण आधुनिक आवर्तसारणीतील आवर्ती कल अणु आकारमान धातू-अधातू गुणधर्म जरा डोके चालवा