रासायनिक अभिक्रिया व समीकरणे Go Back करून पहा views 4:51 आता आपण एक प्रयोग करून पाहूया.साहित्य: तापमापी, बाष्पनपात्र, तिवई, नरसाळे, परीक्षानळ्या, बन्सेन बर्नर, इत्यादी.रासायनिक पदार्थ: चुनखडीचे चूर्ण, कॉपर सल्फेट, कॅल्शियम क्लोराईड, पोटॅशिअम क्रोमेट, जस्ताची पूड, सोडिअम कार्बोनेट, थॅलिक अनहायड्राईड इत्यादी.कृती:1) तिवईवर ठेवलेल्या बाष्पनपात्रामध्ये एक चमचाभर चुनखडी (CaCo3) टाका. त्या बाष्पनपात्राला भरपूर उष्णता द्या. जेव्हा आपण चुनखडी असलेल्या बाष्पनपात्राला उष्णता देतो तेव्हा कार्बनडायऑक्साइड(Co2) वायू मुक्त होतो व कॅल्शियम ऑक्साइडची(CaO) भुकटी तयार होते. हा रासायनिक बदल आहे.कृती:2) आता कॉपर सल्फेटच्या (CaSo4) द्रावणात जस्ताची पूड (Zn dust) टाकली असता रंगहीन द्रावण तयार झालेले दिसते. कॉपर सल्फेटचे द्रावण हे निळ्या रंगाचे असून आपण त्यात जस्ताची पूड घातली असता, झिंक सल्फेटचे (ZnSo4 ) चे रंगहीन द्रावण तयार झालेले आपल्याला दिसते. हा रासायनिक बदल झाला आहे.जे पदार्थ बंध विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियेत सहभागी होतात त्यांना 'अभिक्रियाकारक किंवा अभिकारक' असे म्हणतात. तसेच अभिक्रियेचा परिणाम म्हणून नवीन बंध तयार होऊन जे पदार्थ नव्याने तयार होतात त्यांना 'उत्पादिते असे म्हणतात. उदाहरणार्थ जेव्हा कोळशाचे हवेत ज्वलन होते तेव्हा कार्बनडायऑक्साईड तयार होतो. हे एक रासायनिक अभिक्रियेचे उदाहरण आहे. या उदाहरणात कोळसा (कार्बन) आणि ऑक्सिजन हे अभिकारक आहेत. प्रस्तावना करून पहा रासायनिक समीकरणे हे करून पहा रासायनिक समीकरण संतुलित करण्याच्या पायऱ्या जरा डोके चालवा रासायनिक अभिक्रियेचे प्रकार अपघटन अभिक्रिया विस्थापन अभिक्रिया उष्माग्राही आणि उष्मादायी प्रक्रिया व अभिक्रिया रासायनिक अभिक्रियेचा दर रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक पुढील भाग माहीत आहे का तुम्हांला? जरा डोके चालवा जरा डोके चालवा माहीत आहे का तुम्हांला?