रासायनिक अभिक्रिया व समीकरणे

जरा डोके चालवा

views

4:18
माझ्या काही प्रश्नांची उत्तरे द्या. पेयजलाच्या शुद्धीकरणासाठी कोणता ऑक्सिडक वापरतात? पाणी स्वच्छतेसाठी आपण क्लोरीन वापरतो. आणि पेयजलाच्या शुद्धीकरणासाठी क्लोरीन असणारे पदार्थ ऑक्सिडक म्हणून वापरतात. मग पाण्याच्या टाक्या साफ करताना पोटॅशिअम परमॅंगनेट का वापरतात? पाण्याच्या टाक्यांमध्ये सुक्ष्म रोगजंतू तसेच कुजलेल्या अंड्याचा वास असलेला हायड्रोजन सल्फाईड (H2S) असतो. हे काढून टाकण्यासाठी पाण्याच्या टाक्या साफ करताना पोटॅशिअम परमॅंगनेट वापरतात. ज्या रासायनिक अभिक्रियांमध्ये अभिकारके हायड्रोजन प्राप्त करतात त्या अभिक्रियांना ‘क्षपण’ अभिक्रिया असे म्हणतात. त्याचप्रमाणे ज्या अभिक्रियांमध्ये अभिकारकातील ऑक्सिजन निघून जातो आणि उत्पादित तयार होते अशा अभिक्रियांना सुद्धा ‘क्षपण’ असे म्हणतात. जो पदार्थ क्षपन घडवून आणतो त्याला क्षपणक असे म्हणतात. जेव्हा काळ्या कॉपर ऑक्साइडवरून हायड्रोजन वायू प्रवाहित करतात. तेव्हा गुलाबीसर तपकिरी रंगाचे कॉपर तयार होते. या अभिक्रियेत कॉपर ऑक्साइडमधून ऑक्सिजन निघून जातो.या अभिक्रियेच्या वेळी कॉपर ऑक्साइड(CuO) मधील ऑक्सिजनचा अणू बाहेर पडतो. म्हणजेच या अभिक्रियेत कॉपर ऑक्साइडचे क्षपण होते. तर हायड्रोजनचा रेणू ऑक्सिजन अणू स्वीकारतो व पाणी (H2O) तयार होते. म्हणून हायड्रोजनचे ऑक्सिडीकरण होते. अशाप्रकारे ऑक्सिडीकरण व क्षपण या अभिक्रिया एकाच वेळी या अभिक्रियेत घडतात. ऑक्सिडीकरनामुळे क्षपणकाचे ऑक्सिडीकरण होते व क्षपणकामुळे ऑक्सिडकाचे क्षपण होते. या वैशिष्ट्यांमुळे क्षपण अभिक्रिया व ऑक्सिडीकरण अभिक्रिया अशा दोन पदांऐवजी रेडॉक्स अभिक्रिया अशा एकाच पदाचा वापर करतात.