रासायनिक अभिक्रिया व समीकरणे Go Back जरा डोके चालवा views 2:28 रेडॉक्स अभिक्रियांची आणखी काही उदाहरणे आहेत.या अभिक्रियेत हायड्रोजन सल्फाईड H2S हा क्षपणक आहे. तर सल्फरडाय ऑक्साईड SO2 हा ऑक्सिडक आहे. कारण हायड्रोजन हा सल्फरडाय ऑक्साईड SO2 मधला ऑक्सिजनचा अणू स्वीकारतो. या अभिक्रियेत क्षपण व ऑक्सिडीकरण कसे होते ते पहा. हायड्रोजन सल्फाईड + सल्फरडाय ऑक्साईड à सल्फर +पाणी या अभिक्रियेच्या वेळी सल्फरडाय ऑक्साईड मधील ऑक्सिजनचा अणू बाहेर पडतो. अर्थात त्याचे क्षपण होते, तर हायड्रोजनचा अणू ऑक्सिजन स्वीकारतो आणि पाणी (H2O) तयार होते. म्हणून हायड्रोजनचे ऑक्सिडीकरण होते. घरातील अॅल्युमिनिअमच्या भांड्यावरची चकाकी काही दिवसांनी कमी होऊन ती भांडी निस्तेज होतात, असे का होते? हा प्रश्न आपल्याला पडतो. असे होते कारण, अॅल्युमिनिअमची भांडी खूप काळ वापरल्यानंतर किंवा अॅल्युमिनिअमची भांडी बराच काळ तशीच ठवली तर अॅल्युमिनिअमचे ऑक्सिडीकरण होते आणि अॅल्युमिनिअम ऑक्साइडचा AI2O3 थर त्या भांड्यावर जमा होतो. म्हणून त्या भांड्यावरची चकाकी काही दिवसांनी कमी होऊन ती निस्तेज होतात. प्रस्तावना करून पहा रासायनिक समीकरणे हे करून पहा रासायनिक समीकरण संतुलित करण्याच्या पायऱ्या जरा डोके चालवा रासायनिक अभिक्रियेचे प्रकार अपघटन अभिक्रिया विस्थापन अभिक्रिया उष्माग्राही आणि उष्मादायी प्रक्रिया व अभिक्रिया रासायनिक अभिक्रियेचा दर रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक पुढील भाग माहीत आहे का तुम्हांला? जरा डोके चालवा जरा डोके चालवा माहीत आहे का तुम्हांला?