रासायनिक अभिक्रिया व समीकरणे

उष्माग्राही आणि उष्मादायी प्रक्रिया व अभिक्रिया

views

4:57
उष्माग्राही आणि उष्मादायी प्रक्रिया व अभिक्रिया: विविध प्रक्रियांमध्ये व अभिक्रियांमध्ये उष्णतेचे आदान प्रदान होते. त्यावरून प्रक्रिया व अभिक्रियांचे दोन प्रकार पडतात. 1) उष्माग्राही अभिक्रिया: ज्या अभिक्रियांमध्ये उष्णता शोषली जाते, त्या अभिक्रियेला उष्माग्राही अभिक्रिया म्हणतात. उदा 1) बर्फ वितळणे. 2) पोटॅशिअम नायट्रेट पाण्यात विरघळणे. हे भौतिक बदल घडून येतांना बाहेरील उष्णता वापरली जाते. 2) उष्मादायी अभिक्रिया (Exothermic Reaction): ज्या अभिक्रियेत उष्णता बाहेर टाकली जाते त्या अभिक्रियेला उष्मादायी अभिक्रिया म्हणतात. उदा.1) पाण्यापासून बर्फ तयार होणे. 2) सोडिअम हायड्रॉक्साइड पाण्यात विरघळणे. उष्माग्राही व उष्मादायी प्रक्रिया करणे: उष्माग्राही व उष्मादायी प्रक्रिया समजण्यासाठी एक प्रयोग करूया. प्रयोगासाठी लागणारे साहित्य: प्लास्टिकच्या दोन बाटल्या, मोजपात्र, तापमापी इ.रासायनिक पदार्थ: पोटॅशिअम नायट्रेट (KNo3), सोडिअम हायड्रॅाक्साईड (NaoH), पाणी इ.कृती: प्रथम प्लास्टिकच्या दोन बाटल्यांमध्ये प्रत्येकी 100 ml पाणी घ्या. प्लास्टिक हे उष्णतारोधक असल्यामुळे उष्णतेचा ऱ्हास टाळता येतो. आता बाटल्यांतील पाण्याच्या तापमानाची नोंद करा. एका बाटलीत 5 ग्रॅम पोटॅशिअम नायट्रेट (KNo3) घालून बाटली चांगली हलवा. आता पुन्हा नवीन तयार झालेल्या तापमानाची नोंद करा. नंतर दुसऱ्या बाटलीत 5 ग्रॅम सोडिअम हायड्रॅाक्साईड (NaoH) घाला आणि ते मिश्रण एकत्र करण्यासाठी बाटली चांगली हलवा आणि तापमानाची नोंद करा.