रासायनिक अभिक्रिया व समीकरणे

विस्थापन अभिक्रिया

views

2:46
आपण कॉपर सल्फेटच्या निळ्या द्रावणात जस्त पूड घातल्यावर झिंक सल्फेटचे रंगहीन द्रावण तयार होऊन या अभिक्रियेत उष्णता बाहेर पडते. या रासायनिक अभिक्रियेवरून आपल्याला समजते की कॉपर सल्फेटमधील (Cu2+) 2 आयनांची जागा (झिंक) Zn अणूंपासून तयार झालेले (झिंक दोन) Zn2+ हे आयन घेतात. व कॉपर दोन (Cu2+) आयनांपासून तयार झालेले कॉपरचे(Cu) अणू बाहेर पडतात. म्हणजेच झिंक (Zn) मुळे CuSo4 कॉपर सल्फेटमधील कॉपरचे (Cu) चे विस्थापन होते. जेव्हा एका संयुगातील कमी अभिक्रियाशील मूलद्रव्याच्या आयनांची जागा दुसरे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य स्वतः आयन बनून घेते, त्यारासायनिक अभिक्रियेला 'विस्थापन अभिक्रिया' म्हणतात. जस्ताप्रमाणेच लोह व शिसे ही सुद्धा तांब्याला त्याच्या संयुगातून विस्थापित करतात.या अभिक्रियेत आयर्न (लोखंड Fe) ची पूड कॉपर सल्फेट द्रावणात टाकली असता कॉपर (तांबे - Cu) पेक्षा आयर्न हे जास्त क्रियाशील असल्यामुळे ते कॉपरसल्फेटमधील कॉपर काढून टाकते व रंगहीन फेरस सल्फेटचे द्रावण तयार होते आणि उष्णता बाहेर पडते.