रासायनिक अभिक्रिया व समीकरणे

माहीत आहे का तुम्हांला?

views

5:13
पेशींमधील श्वसनादरम्यान रेडॉक्स अभिक्रिया घडत असते. तेथे सायट्रोक्रोम सी ऑक्सिडेज ह्या विकराचा रेणू इलेक्ट्रॉनचे वहन करून ही अभिक्रिया घडवून आणतो.क्षरण: (Corrosion) क्षरण म्हणजे काय? ते कसे होते हे पाहण्यासाठी आपण एक प्रयोग करू या. साहित्य: चार परीक्षानळ्या, चार छोटे लोखंडी खिळे, रबरी बुच इत्यादी. रासायनिक पदार्थ: निर्जल कॅल्शिअम क्लोराइड, तेल, उकळलेले पाणी इत्यादी. कृती: चार परीक्षानळी घेऊन त्या वेगवेगळ्या चार टेस्ट ट्यूब स्टँडवर ठेवा. एका परीक्षानळीत थोडे उकळलेले पाणी घेऊन त्यावर तेलाचा थर टाका. दुसऱ्या परीक्षानळीत थोडे मिठाचे द्रावण घ्या. तिसऱ्या परीक्षनळीत फक्त हवाच असेल. चौथ्या परीक्षानळीत थोडे निर्जल कॅल्शिअम क्लोराइड घ्या. आता प्रत्येक परीक्षानळीत एक छोटा लोखंडी खिळा टाका. चौथी परीक्षानळी मात्र रबरी बुचाने बंद करा. चारही परीक्षानळ्या काही दिवस तशाच ठेवा आणि नंतर त्यांचे निरीक्षण करा. काही दिवसांनी निरीक्षण केले असता त्या निरीक्षणात आपल्याला असे आढळून येईल की, मिठाचे द्रावण असलेल्या परीक्षानळीतील खिळ्याला सर्वप्रथम गंज निर्माण झालेला आहे. त्यानंतर हवा असलेल्या परीक्षानळीतील खिळ्याच्या रंगात थोड्या प्रमाणात बदल झालेला दिसेल. उकळलेले पाणी व तेल असलेल्या परीक्षानळीत फारच थोड्या प्रमाणात बदल झालेला जाणवेल. निर्जल कॅल्शिअम क्लोराइड व रबरी बुचाने बंद असलेल्या परीक्षानळीतील खिळ्यांमध्ये बदल झालेला दिसणार नाही. तो खिळा आहे तसाच राहील. यावरून आपल्या लक्षात येते की, गंजण्यासाठी हवा व पाणी या दोन्हींची आवश्यकता असते. क्षारांच्या सानिध्यात गंजण्याची क्रिया जलद होते.