रासायनिक अभिक्रिया व समीकरणे Go Back अपघटन अभिक्रिया views 3:40 अपघटन अभिक्रिया (Decomposition Reaction): अपघटन हा एक रासायनिक अभिक्रियेचा प्रकार आहे. जेव्हा योग्य परिस्थितीत एका संयुगाचे तुकडे होऊन दोन किंवा अधिक पदार्थ निर्माण होतात. तेव्हा त्याला अपघटन अभिक्रिया म्हणतात. आपण अपघटन अभिक्रिया बघण्यासाठी काही कृती करूया. या कृतीसाठी लागणारे साहित्य: बाष्पनपात्र, बन्सेन बर्नर, इत्यादी. रासायनिक पदार्थ: साखर, सल्फ्युरिक आम्ल, इत्यादी. कृती: एका बाष्पनपात्रामध्ये थोडीशी साखर घ्या. त्या बाष्पनपात्राला बन्सेन बर्नरच्या साहाय्याने उष्णता द्या. उष्णता दिल्यानंतर थोडया वेळाने करपलेला काळा पदार्थ तयार झालेला दिसेल. अशाप्रकारे ज्या अभिक्रियेमध्ये एकच अभिक्रियाकारक असतो व त्यापासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात त्या अभिक्रियेला अपघटन म्हणतात.कॅल्शिअम कार्बोनेटचे अपघटन.) ही कृती करत असताना असे लक्षात येते की, कॅल्शिअम कार्बोनेटला उष्णता दिली असता त्याचे अपघटन होऊन तयार झालेला कार्बन डायऑक्साईड वायू वक्रनळीच्या सहाय्याने चुन्याच्या निवळीतून (Ca(OH)2) बाहेर पडला. त्यामुळे चुन्याची निवळी दुधी रंगाची झालेली दिसते. आणि कॅल्शिअम ऑक्साईडचीभुकटी हे दुसरे उत्पादित पहिल्या परीक्षानळीत शिल्लक राहते. प्रस्तावना करून पहा रासायनिक समीकरणे हे करून पहा रासायनिक समीकरण संतुलित करण्याच्या पायऱ्या जरा डोके चालवा रासायनिक अभिक्रियेचे प्रकार अपघटन अभिक्रिया विस्थापन अभिक्रिया उष्माग्राही आणि उष्मादायी प्रक्रिया व अभिक्रिया रासायनिक अभिक्रियेचा दर रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक पुढील भाग माहीत आहे का तुम्हांला? जरा डोके चालवा जरा डोके चालवा माहीत आहे का तुम्हांला?