रासायनिक अभिक्रिया व समीकरणे

रासायनिक समीकरणे

views

5:13
रासायनिक समीकरणांचा अभ्यास करण्यासाठी आपण एक रासायनिक अभिक्रियेचे उदाहरण समजून घेवू. मागील कृती 2 मध्ये कॉपर सल्फेटच्या (CaSo4) निळ्या रंगाच्या द्रावणात जस्ताची पूड (zn dust) घातल्यावर झिंक सल्फेटचे (ZnSo4) रंगहीन द्रावण तयार झाले होते. ही रासायनिक अभिक्रिया आपण अशी देखील संक्षिप्त स्वरुपात मांडू शकतो: कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण आणि जस्ताची भुकटी यांची अभिक्रिया होऊन झिंक सल्फेटचे जलीय द्रावण व तांबे तयार होते. रासायनिक सूत्रांचा वापर करून मांडलेल्या रासायनिक अभिक्रियेला रासायनिक समीकरण असे म्हणतात. वरील समीकरणात कॉपरसल्फेट (CuSO4) व जस्त (Zn) ही अभिक्रियाकारके आहेत. यात कॉपरसल्फेट व झिंक यांची एकमेकांबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन संपूर्णपणे वेगळे गुणधर्म असलेले तांब्याचे कण (Cu) व रंगहीन झिंक सल्फेटचे द्रावण (CuSO4) ही नवीन उत्पादिते तयार होतात. अभिक्रिया होताना कॉपर सल्फेट(CuSO4) ह्या अभिकारकांमधील आयनिक बंधाचे विभाजन होते. तसेच ZnSO4 (झिंक सल्फेट) ह्या उत्पादितातील आयनिक बंध अभिक्रिया होताना तयार होतो.