रासायनिक अभिक्रिया व समीकरणे

हे करून पहा

views

3:11
आता आपण एक कृती करूया. त्यासाठी परीक्षानळी, शंकुपात्र, तराजू इत्यादी साहित्य घ्या.रासायनिक पदार्थ: सोडिअम क्लोराइड, सिल्व्हर नायट्रेट यांची द्रावणे घ्या.कृती: 1) प्रथम सोडिअम क्लोराइडचे द्रावण शंकुपात्रात घ्या व सिल्व्हर नायट्रेटचे द्रावण परीक्षानळीत घ्या. नंतर सिल्व्हर नायट्रेट टाकलेल्या परीक्षानळीला दोरा बांधून ती शंकूपात्रात सोडा. नंतर रबरी बूच लावून शंकुपात्र हवाबंद करा. शंकुपात्राचे तराजूच्या सहाय्याने वजन करा. आता शंकुपात्र तिरके करून परीक्षानळीतील द्रावण शंकुपात्रातील द्रावणात मिसळा. आणि शंकुपात्राचे पुन्हा वजन करा. तुम्हांला कोणते बदल आढळले? एखादा अविद्राव्य पदार्थ तयार झाला का? वजनांमध्ये काही बदल झाला का? ते सांगा. वरील कृती करताना द्रावणाचा रंग बदलला आणि द्रावण सफेद (पांढऱ्या) रंगाचे झाले. या कृतीतून सिल्व्हर क्लोराइड (Ag(l) हा पदार्थ तयार झाला. तसेच दोन्ही नोंदवलेले वजन एकसारखेच होते.सिल्व्हर नायट्रेट व सोडिअम क्लोराइड यांच्यात अभिक्रिया होऊन सफेद रंगाचा सिल्व्हर क्लोराइडचा (Ag(l) अवक्षेप तयार होतो. तसेच या कृतीत द्रावणाच्या वजनामध्ये कोणताच बदल झालेला आढळून येत नाही.