रासायनिक अभिक्रिया व समीकरणे

रासायनिक अभिक्रियेचे प्रकार

views

4:01
अभिक्रियेतील अभिकारके व उत्पादिते यांचे स्वरूप व संख्या यानुसार अभिक्रियांचे चार प्रकार पडतात. संयोग अभिक्रिया, अपघटन अभिक्रिया, विस्थापन अभिक्रिया आणि उष्माग्राही अभिक्रिया.संयोग अभिक्रिया: रासायनिक अभिक्रियांच्या सामान्य श्रेणीमध्ये संयोग अभिक्रिया असते. योग्य परिस्थितीत जेव्हा दोन किंवा अधिक पदार्थ एकत्र येऊन एकच पदार्थ निर्माण होतो तेव्हा त्याला संयोग अभिक्रिया म्हणतात.रासायनिक पदार्थ: हायड्रोक्लोरिक आम्ल, अमोनिआ द्रावण, चुनकळी, इत्यादी. कृती1: एका परीक्षानळीमध्ये थोडे हायड्रोक्लोरिक आम्ल घ्या. या परीक्षानळीला उष्णता द्या. एक काचकांडी अमोनिआच्या द्रावणात बुडवून ती त्या परीक्षानळीच्या तोंडावर धरा आणि निरीक्षण करा. या कृतीचे निरीक्षण केले असता काचकांडीच्या टोकांवरून जशी उदबत्ती पेटल्यावर पांढरा धूर बाहेर पडताना दिसतो, त्याचप्रकारे पांढऱ्या रंगाच्या दाट वाफा येताना दिसतील. हे पाहिल्यानंतरतुम्हाला प्रश्न पडला असेल की, असे का घडले? काय झाले असावे? तर मुलांनो, परीक्षानळी तापल्याने हायड्रोजन क्लोराइड(HCl) च्या वाफा बाहेर येवू लागल्या.