रासायनिक अभिक्रिया व समीकरणे

माहीत आहे का तुम्हांला?

views

4:00
तुम्हांला खालील गोष्टी माहित असायला हव्यात. 1. प्रत्येक रासायनिक बदलामध्ये एक किंवा अधिक रासायनिक अभिक्रिया घडतात. 2. काही रासायनिक अभिक्रिया शीघ्र तर काही मंद गतीने होतात. 3. तीव्र आम्ल व तीव्र आम्लारी यांमधील अभिक्रिया तात्काळ होते. 4. आपल्या शरीरात विकर (Enzymes) जैवरासायनिक अभिक्रियांचा दर वाढवितात व शरीराच्या तापमानालाच त्या घडवून आणतात. 5. नाशवंत खाद्यपदार्थ शीतकपाटात जास्त काळ टिकतात. खाद्यपदार्थाच्या विघटनाचा दर तापमानामुळे कमी होतो. 6. पाण्यापेक्षा तेलावर भाजी लवकर शिजते. 7. जर अभिक्रियेचा दर जलद असेल तर रासायनिक कारखान्यांमध्ये रासायनिक प्रक्रिया फायदेशीर ठरतात. 8. अभिक्रियेचा दर हा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचा आहे. 9. पृथ्वीच्या वातावरणातील ओझोन वायूचा थर सुर्याच्या अतिनील किरणांपासून आपल्या पृथ्वीवरील सजीवसृष्टीचे संरक्षण करतो. हा थर कमी होणे किंवा टिकून राहणे ही प्रक्रिया साधारणत: ओझोन रेणूच्या निर्मितीच्या आणि नष्ट होण्याच्या दरावर अवलंबून असते.