रासायनिक अभिक्रिया व समीकरणे

प्रस्तावना

views

4:33
भौतिक बदलांच्या वेळी केवळ पदार्थाच्या अवस्थेचेच रुपांतर होते आणि ते तात्पुरते राहते. थोडक्यात पदार्थात होणाऱ्या ज्या बदलात त्याचे फक्त भौतिक गुणधर्म बदलतात, कोणताही नवा पदार्थ तयार होत नाही आणि मूळ पदार्थ सहजासहजी परत मिळतो अशा बदलास भौतिक बदल म्हणतात. भौतिक बदलाचे उदाहरण दयायचे झाले तर लोहचुंबक आणि खिळा घ्या. लोहचुंबकाला एक खिळा चिटकला की लगेच त्यात चुंबकत्व निर्माण होऊन त्या खिळ्याला दुसरा खिळा चिटकतो. परंतु जर लोहचुंबक खिळ्यापासून दूर नेला तर दुसरा खिळा त्या खिळ्याला चिटकत नाही. कारण त्या खिळ्यातील चुंबकत्व नष्ट होते. खिळ्यात निर्माण झालेले चुंबकत्व तात्पुरते असते. एखादया प्रक्रियेत द्रव्याचे संघटन बदलले, तर हा बदल कायमस्वरूपी असतो. यालाच रासायनिक बदल म्हणतात. रासायनिक बदलात पदार्थाचे रासायनिक गुणधर्म बदलतात. रासायनिक बदलाचे उदाहरण म्हणजे कोळशाचे ज्वलन झाल्यावर कार्बनडायऑक्साईड तयार होतो.आपण भौतिक बदल व रासायनिक बदल म्हणजे काय ते पाहिलेच आहेत. 18 व्या व 19 व्या शतकात काही शास्त्रज्ञांनी रासायनिक अभिक्रियांच्या संदर्भात मूलभूत प्रयोग केले. त्यातून त्यांना असं समजलं की रासायनिक अभिक्रिया होताना द्रव्याचे संघटन बदलते आणि तो बदल कायमस्वरूपी राहतो.