गुरुत्वाकर्षण

प्रस्तावना

views

4:52
वर फेकलेला चेंडू सरळ रेषेत खाली येणे, झाडावरील फळ जमिनीवर पडणे, हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे घडते. वस्तुमान असलेल्या कोणत्याही दोन वस्तूंच्या एकमेकांकडे आकर्षिल्या जाण्याच्या प्रवृत्तीला ‘गुरुत्वाकर्षण’ असे म्हणतात. गुरुत्वाकर्षणाचे बल हे एक वैश्विक बल असून ते केवळ पृथ्वीवरील दोन वस्तूंमध्येच नव्हे तर कोणत्याही दोन खगोलीय वस्तूंमध्येही प्रयुक्त होते, हे आपण मागील इयत्तेत पाहिलेच आहे. आता आपण मागील इयत्तेत या बलाविषयी काय शिकलो आहोत ते थोडे आठवूया.