गुरुत्वाकर्षण Go Back सोडविलेली उदाहरणे views 2:52 उदा.1) महेंद्र व विराट एकमेकांपासून 1m अंतरावर बसले आहेत त्यांची वस्तुमाने अनुक्रमे 75kg व 80 kg आहेत. त्यांच्यामधील गुरुत्वीय बल किती आहे? दिलेली माहिती : महेंद्र व विराट यांमधील अंतर = r = 1m महेंद्राचे वस्तुमान = m_1 = 75kg विराटचे वस्तुमान = m_2 = 80kg गुरूत्वीय स्थिरांक = G = 6.67 x 10-11 न्यूटन मीटर वर्ग प्रती किलोग्रॅम वर्ग (Nm2/kg2) न्यूटनच्या सिद्धांतानुसार , F = (Gm_1 m_2)/r^2म्हणजेच [बल = (गुरूत्वीय स्थिरांक x महेंद्राचे वस्तुमान x विराटचे वस्तुमान)/(महेंद्र व विराट यांमधील अंतर)] = (6.67 x〖10〗^(-11) x 75 x 80)/1^2N(न्यूटन) = (6.67 x〖10〗^(-11) x 6000)/1 N(न्यूटन) = 6.67 x 6000 x 10-11 N(न्यूटन) = 40,020 x 10-11N(न्यूटन)इथे〖10〗^(-11)चे अवयव पाडू. ∴10-11=〖10〗^(-7)× 〖10〗^(-4) = 40020/〖10〗^4× 〖10〗^(-7) = 40020/10000 × 〖10〗^(-7) = 4.002 x 10-7 ∴बल (F) = 4.002 x 10-7N(न्यूटन) ∴ महेंद्र व विराट यांमधील गुरुत्वीय बल 4.002 x 10-7N(न्यूटन) इतके असेल. हे बल नगण्य आहे. म्हणजे हे बल इतर बलाच्या तुलनेत क्षीण आहे हे आपल्याला माहित आहे. प्रस्तावना बल व गती वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बल केप्लरचे नियम न्युटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत एक समान वर्तुळाकार गती / अभिकेंद्री बलाचे परिणाम सोडविलेली उदाहरणे उदाहरण 2 माहित आहे का तुम्हाला? सोडविलेली उदाहरणे जरा डोके चालवा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील गुरुत्व त्वरणाचे (g) मूल्य ‘g’ च्या मुल्यात होणारे बदल वस्तूमान व वजन जरा डोके चालवा माहीत आहे का तुम्हांला? गुरूत्वीय लहरी मुक्तपतन माहीत आहे का तुम्हांला? उदाहरण 2 गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा m वस्तुमान असलेल्या वस्तूची ऊर्जा