गुरुत्वाकर्षण

एक समान वर्तुळाकार गती / अभिकेंद्री बलाचे परिणाम

views

4:48
न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा नियम सांगताना केप्लरच्या तिसऱ्या नियमांची मदत घेतली आहे?कारण गुरुत्वाकर्षणाचा नियम सांगताना न्यूटनने सांगितले आहे की, बल हे अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. पण ते कसे असते ते आता पाहूया.केप्लरचा तिसरा नियम तुमच्यापैकी कोन सांगेल बर? सूर्याची परीक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. समजा एक वस्तू एकसमान वर्तुळाकार गतीने फिरत आहे. त्यावेळी गतिमान असलेल्या वस्तूवर केंद्राकडे निर्देशित अभिकेंद्री बल प्रयुक्त होत असते, हे आपण पाहिलेच आहे. त्यावेळी या वस्तूचे, वस्तुमान= m ने,कक्षेची त्रिज्या=r ने, ववस्तूची चाल=vने दर्शविली तर बलाचे परिणाम (mv^2)/rएवढे असते. हे आपल्याला गणिती क्रियांद्वारे दाखवता येते. जर एक ग्रह वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परीक्रमा करत असेल तर त्यावर सूर्याच्या दिशेने प्रयुक्त होणारे अभीकेंद्री बल हे,बल = ( वस्तुमान ×〖चाल〗^2)/(कक्षेची त्रिज्या) असले पाहिजे. येथेm= ग्रहाचे वस्तुमान, v= ग्रहाची चाल, r = ग्रहाच्या वर्तुळाकार कक्षेची त्रिज्या म्हणजेच ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर आहे.ग्रहाची चाल ही त्याचा आवर्तकाल (T) म्हणजे सूर्याभोवती एक परिक्रमा करण्याचा कालावधी व त्रिज्या वापरून काढू शकतो. तर चाल काढण्याचे सूत्र असे आहे: चाल =(कापलेलेअंतर)/(त्यासाठी लागलेला काळ) ग्रहाने एका परिक्रमेत पार केलेले अंतर = कक्षेचा परिघ