गुरुत्वाकर्षण

जरा डोके चालवा

views

3:37
न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणे प्रत्येक वस्तू इतर वस्तूला आकर्षित करते. म्हणजे पृथ्वी सफरचंदाला स्वत:कडे खेचते तसेच सफरचंदही पृथ्वीला तेवढयाच बलाने स्वत:कडे खेचतो. मग सफरचंद पृथ्वीवर का पडते, पृथ्वी सफरचंदाकडे का सरकत नाही? शि: तर मुलांनो, न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणे प्रत्येक वस्तू इतर वस्तूला आकर्षित करते. म्हणजेच पृथ्वी सफरचंदाला स्वत:कडे खेचते तसेच सफरचंदही पृथ्वीला तेवढयाच बलाने स्वत:कडे खेचतो. पण सफरचंदाच्या विस्थापनाच्या परिणामाच्या मानाने पृथ्वीच्या विस्थापनाचे परिणाम नगण्य असते. तसेच पृथ्वीचे वस्तुमान हे सफरचंदाच्या वस्तूमानापेक्षा जास्त असते. म्हणजेच, पृथ्वीच्या त्वरणाचे परिणाम सफरचंदाच्या त्वरणाच्या परिणामापेक्षा कमी असते. मुलांनो पृथ्वीच्या गुरूत्वीय बलाविषयी अभ्यास केल्यानंतरही एक प्रश्न राहतोच, चंद्र व इतर ग्रह पृथ्वीवर का पडत नाहीत. चंद्र हा पृथ्वीभोवती परिक्रमा करतो हे आपल्याला माहितच आहे. पण चंद्र पृथ्वीभोवती परिक्रमा का करतो? तर पृथ्वीचे गुरुत्वीय बल चंद्रावरही प्रयुक्त होत असल्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती परिक्रमा करतो. तसेच पृथ्वीभोवती परिक्रमा करणाऱ्या इतर उपग्रहांवर देखील पृथ्वीचे गुरूत्वीय बल प्रयुक्त झालेले असते. म्हणूनच चंद्र व उपग्रह पृथ्वीभोवती फिरतात. पृथ्वी त्यांना स्वत:कडे आकर्षित करते परंतु ते सफरचंदाप्रमाणे पृथ्वीवर पडत नाहीत कारण, चंद्र व इतर कुत्रिम उपग्रहाना त्यांच्या कक्षेतील वेग असतो. हा वेग त्यांना नसता तर ते सफरचंदाप्रमाणे पृथ्वीवर खाली पडले असते.