गुरुत्वाकर्षण

वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बल

views

3:05
वर्तुळाकार गती समजण्यासाठी आपण एक कृती करूया. प्रथम एक दोरी घ्या. तिच्या एका टोकाला दगड बांधा आणि दोरीचे दुसरे टोक हातात धरा. आता दोरीला बांधलेला दगड गोल फिरवा. जेणेकरून तो दगड एका वर्तुळावरून फिरेल. मुलांनो, ही कृती करत असताना आपण या दगडावर काही बल प्रयुक्त करत आहोत का? दगड फिरवण्यासाठी आपण बल लावत आहोत. त्याची दिशा कोणती असेल? आणि जर आपण हे बल प्रयुक्त केले नाही तर काय होईल? असे केल्यास दगडावर काय प्रभाव पडेल? असे वेगवेगळे प्रश्न आपल्या मनात येतात. तर मुलांनो, जोपर्यंत आपण दोरीला धरून ठेवले आहे तो पर्यंत त्या दगडाला आपण आपल्याकडे खेचतो. म्हणजेच वर्तुळाच्या केंद्राकडे खेचतो. याचाच अर्थ असा होतो की आपण दगडावर कक्षेच्या दिशेने बल प्रयुक्त करत आहोत. जर दोरी सोडून दिली तर आपण दगडावर लावलेले बल संपुष्टात येईल. आणि त्याक्षणी वर्तुळावरील दगडाच्या स्थानाशी असणाऱ्या स्पर्षीकेच्या दिशेने दगड फेकला जाईल. कारण त्याक्षणी ती दगडाच्या वेगाची दिशा असते. यापूर्वीही आपण एक अशी कृती केली होती ती तुम्हाला आठवत असेल. त्यात एका गोल फिरणाऱ्या चकतीवर 5 रुपयांचे नाणे ठेवले होते. ते देखील स्पर्शिकेच्या दिशेने फेकले गेले होते.