गुरुत्वाकर्षण

वस्तूमान व वजन

views

4:56
वस्तुमान: पदार्थाच्या द्रव्य संचयालाच वस्तूमान म्हणतात. पदार्थात नैसर्गिकपणे स्थितीबदलास विरोध करण्याची प्रवृत्ती असते, म्हणजेच जडत्व असते. वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप आहे. जितके वस्तुमान जास्त तितके जडत्व जास्त. वस्तुमान ही अदिश राशी आहे. अदिश राशी म्हणजे केवळ परिमाणाच्या साहाय्याने जी राशी व्यक्त करता येते तिला अदिश राशी म्हणतात.उदाहरणार्थ, लांबी, क्षेत्रफळ, वस्तुमान इत्यादी. अदिश राशी ही फक्त परिमाण व्यक्त करते. ही राशी दिशा व्यक्त करू शकत नाही. म्हणून जगात कोठेही गेले तरी वस्तुमानाचे मूल्य बदलत नाही. त्याचे मूल्य सगळीकडे सारखेच असते. वस्तुमानाचे SI एकक किलोग्रॅम आहे. न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार वस्तूमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप आहे. म्हणजे जितके वस्तुमान जास्त तितके जडत्वही जास्त असते. वजन: वजन हा शब्द आपण आपल्या दैनंदीन जीवनात खूप वेळा वापरतो. ज्या वस्तू आपण ग्रॅम, किलोग्रॅममध्ये मोजतो ते त्याचे वजन नसून वस्तुमान आहे. या वस्तुमानावर जेवढे गुरूत्वीय बल कार्य करते त्याला वजन असे म्हणतात. म्हणजेच एखादया वस्तुला पृथ्वी ज्या गुरूत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते, त्याला वस्तूचे वजन असे म्हणतात. म्हणून वजन ही सदिश राशी आहे. ती पृथ्वीवर वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळी भरते. सदिश राशी म्हणजे परिभ्रमण व दिशा यांच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी होय.