गुरुत्वाकर्षण

केप्लरचे नियम

views

4:37
प्राचीन काळापासून मानव ग्रहांच्या स्थितीचे निरीक्षण करत आलेला आहे. गलिलिओच्या आधी ही निरीक्षणे डोळ्याने केली जात होती. सोळाव्या शतकापर्यंत ग्रहांच्या स्थिती व गतीविषयक बरीच माहिती उपलब्ध झालेली होती. या सर्व माहितीचा अभ्यास योहानस केप्लर नामक जर्मन शास्त्रज्ञाने केला. योहानस केप्लर यांचा जन्म 21 डिसेंबर 1571 मध्ये जर्मनीच्या स्टटगार्ट नावाच्या गावात झाला होता. ते एक जर्मन खगोलशास्त्रज्ञ व गणितज्ञ होते. सण 1600 मध्ये ते प्राग मधील टायको ब्राहे या प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञाचे मदतनीस म्हणून कार्य करू लागले. सन 1601 मध्ये टायको ब्राहे यांचा आकस्मिक मृत्यू झाला. त्यानंतर केप्लर यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. टायको ब्राहे यांनी केलेली ग्रहांच्या स्थानांची निरीक्षणे वापरून केप्लर यांनी ग्रहांच्या गतीचे नियम शोधून काढले. केप्लर यांनी खगोलशास्त्रावर विविध पुस्तके लिहिली. त्यांचे कार्य व शोध पुढे न्यूटन यांना त्यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाच्या शोधात उपयोगी पडले. केप्लर यांनी केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, ग्रहांच्या गतीला काही विशिष्ट नियम आहेत. त्यांनी ग्रहांच्या गतीविषयक तीन नियम मांडले ते नियम पुढील प्रमाणे आहेत.