गुरुत्वाकर्षण

‘g’ च्या मुल्यात होणारे बदल

views

4:25
g म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाच्या मुल्यात बदल होतो कारण वस्तू ही पृथ्वीच्या पृष्ठाभागावर असू शकते किंवा ती पृथ्वीपासून काही उंचीवर असू शकते. तर पृथ्वीच्या खोलीनुसार g च्या मुल्यात (किंमतीत) बदल होतात. 1) पृथ्वीच्या पृष्ठाभागावरील मुल्य: मुलांनो आपल्याला पडलेला प्रश्न म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठाभागावर सर्व ठिकाणी g चे मुल्य समान असेल काय? त्याचे उत्तर नाही असे आहे. याचे कारण म्हणजे पृथ्वीही पूर्णपणे गोलाकार नाही. म्हणून तिच्या पृष्ठभागावरील वेगवेगळया बिंदूचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर त्या त्या बिंदूच्या स्थानानुसार बदलते. पृथ्वी स्वत:भोवती फिरत असल्याने तिचा आकार ध्रुवांजवळ थोडा चपटा आहे तर विषुववृत्तावर थोडा फुगीर आहे. म्हणजेच पृथ्वीची त्रिज्या ध्रुवांजवळ कमी तर विषुववृत्ताजवळ जास्त आहे. म्हणून g चे मुल्य ध्रुवांवर सर्वात जास्त म्हणजे 9.832m/s2 आहे तेथून विषुववृत्ताकडे जात असताना ते कमी कमी होत जाते. म्हणजे विषुववृत्तावर g चे मुल्य 9.78 m/s2 आहे.