गुरुत्वाकर्षण

बल व गती

views

2:51
वस्तूवर बल कार्य करते तेव्हा तिच्या गतीमध्ये किंवा आकारामध्ये बदल होतो. म्हणजेच वस्तूच्या दिशेत किंवा गतीत बदल घडवून आणण्यासाठी बल वापरणे आवश्यक असते. मुलांनो आता आपण न्यूटनचे गतीविषयक तीन नियम कोणते ते आठवू. शि: पहिला नियम:एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्य करत नसेल तर त्या वस्तूचा वेग बदलत नाही. अर्थात त्या वस्तूचे त्वरण घडत नाही. म्हणजेच बल लावले नसताना वस्तू जर स्थिर असेल तर ती स्थिर राहील. तिला गती असेल, तर ती एकाच वेगाने व दिशेने पुढे जात राहील. शि: दुसरा नियम:न्यूटनचा गतीविषयक दुसरा नियम आपल्याला असा सांगतो की, वस्तूवर कार्य करत असणाऱ्या बलाची सदिश बेरीज ही त्या वस्तूचे वस्तुमान आणि तिचे त्वरण यांच्या गुणाकाराइतकी असते. म्हणजेच बल= वस्तुमान × त्वरण. शि: तिसरा नियम: न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम म्हणजे जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते, त्याचवेळी दुसरी वस्तूदेखील पहिल्या वस्तूवर तेवढ्याच प्रमाणात उलट दिशेने बल लावते.