गुरुत्वाकर्षण

माहीत आहे का तुम्हांला? गुरूत्वीय लहरी

views

2:49
आपण जेव्हा पाण्यात दगड फेकतो तेव्हा लहरी निर्माण होतात, तसेच दोरीचे दोन्ही टोक धरून हलविल्यास त्यावरही लहरी निर्माण होतात हे आपण पाहिलेच आहे. प्रकाश हा देखील एक प्रकारचा तरंग आहे. त्यास विदयुतचुंबकीय तरंग असे म्हणतात. गॅमा किरण, क्ष-किरण, अतिनील किरण, अवरक्त किरण, सूक्ष्मतरंग व रेडीओ तरंग यांचा देखील आपण अभ्यास केला आहे. हे सर्व विदयुत चुंबकीय तरंगाचे वेगवेगळे प्रकार आहेत. हे तरंग खगोलीय वस्तूमुळे निर्माण होतात व आपण आपल्या उपकरणांद्वारे त्यांना ग्रहण करतो. या लहरीद्वारेच आपल्याला संपूर्ण विश्वाची माहिती मिळते.