गुरुत्वाकर्षण

माहित आहे का तुम्हाला?

views

3:34
महासागराच्या जलसंचयातील पाण्याच्या पातळीत ठराविक कालांतराने पुन्हा: पुन्हा चढउतार होतात, यांस भरती –ओहोटी म्हणतात. शि: यावरून असे लक्षात येते की, समुद्रात होणाऱ्या भरती – ओहोटीची तुम्हाला माहिती आहे. मुलांनो, चंद्र व सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या परिणामांमुळे पृथ्वीवरील महासागरासारख्या मोठ्या जलसंचयातील पाण्याच्या पातळीत ठराविक कालांतराने पुनःपुन्हा चढउतार होतात, म्हणजेच समुद्रास भरती – ओहोटी येते. एक किनाऱ्यावरील समुद्राच्या पाण्याची पातळी दिवसातून नियमित कालावधीने दोन वेळा वाढते व कमी होते. म्हणजेच समुद्रास दिवसाकाठी दोन वेळा भरती व दोन वेळा ओहोटी येते. वेगवेगळ्या स्थानांवर भरती व ओहोटीची वेळ वेगवेगळी असते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही वेळ वेगवेगळी का असते ? कारण भरती – ओहोटी घडविण्यास जरी सूर्य कारणीभूत असला, तरी चंद्र हाच जास्त प्रभावी ठरतो. समुद्राच्या पाण्याची पातळी ही चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षणामुळे बदलते. चंद्र हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेला उगवतो. म्हणूनच वेगवेगळ्या स्थानांवर भरती – ओहोटीची वेळ वेगवेगळी असते.